Saturday, May 25, 2013

थोडक्यात परिचय

 मित्रानो , मी एक एसटीप्रेमी
                                     " रस्ता तिथे एसटी " असे ब्रीदवाक्य असणाऱ्या लाल पिवळी रंगसंगती असणाऱ्या आपल्या एसटी ने आज केवढा मोठा टप्पा गाठला आहे. खूप आधीपासून प्रवाशांच्या मनावर अधिराज्य गाजवत आलेली आणि प्रवाशांची समर्थपणे सेवा करणारी हीच लाल पिवळी सुंदरी - आपली एसटी. तिचे बरेच प्रकार आहेत एशियाड (आता हिरकणी) ,  परिवर्तन बस, शिवनेरी (वातानुकुलीत). प्रकार वेगळे पण हेतू एकच तो म्हणजे प्रवाशांना इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवण्याचा. मी एसटी प्रेमी एसटीचे फोटो काढून ते  लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. एसटी तिचे मार्ग,तिचा क्रमांक,तिचा रंग,तिचा प्रकार या सर्वाची आवड मला आहे.
                                      तर मित्रानो अशा या सुंदर एसटी ची माहिती , मार्ग वगेरे मी फोटोच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.तुम्ही ते फोटो बघण्याचा मनसोक्त आनंद घ्याल अशी अशा करतो.

No comments:

Post a Comment